यावल : तालुक्यातील वढोदा या गावातील रहिवासी एका २६ वर्षीय तरूणाने बुधवारी दुपारी आपल्या राहत्या घरात गळफास घेतला हा प्रकार नातलगांच्या निर्दशनास येताच त्याला तेथुन काढून यावल ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आले येथे डॉक्टरांनी तपासणी करीत त्याला मृत घोषीत केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वढोदा ता.यावल या गावातील रहिवासी पंकज रमेश सोनवणे वढोदा वय २६ हा बुधवारी दुपारी आपल्या घरी होता दरम्यान एक वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेतला हा प्रकार कुटुंब व नातलगांच्या निर्दशनास आला तेव्हा त्याला नागरीकांच्या मदतीने तेथुन काढून यावल ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आले येथे डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी करीत त्याला मृ़त घोषीत केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे मयत याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे त्याने आत्महत्या का केली कळू शकले नाही.
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






