एरंडोल:- बस स्थानका जवळ पेट्रोल टँकरच्या धडकेत शहरातील पायी चालणाऱ्या (३१) युवक ठार झाला. दरम्यान सदरचे टँकर हे जळगाव कडून मालेगाव कडे जात होते. दिनांक १३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान अभिषेक चंद्रशेखर येवलेकर वय वर्ष ३१ हा घरी वडिलांना पाव घेण्यासाठी जात असल्याचे सांगून गेला. रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान रवींद्र पाटील हे घरी आले व म्हणाले की तुमच्या मुला च्या नॅशनल हायवे जळगाव धुळे रस्त्यावर एरंडोल बस स्थानका समोर अपघात झाला आहे.
माहिती मिळाल्यावर आम्ही गेलो असता त्या जळगाव मालेगाव कडे जाणारे पेट्रोलचे टँकर क्रमांक एम. एच. १९ झेड. १९८८ चा वाहन चालक हा आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व परिस्थिती कडे दुर्लक्ष करून चालवत असताना हायवे क्रॉस करत असलेल्या पायी चालणाऱ्या अभिषेक चंद्रशेखर येवलेकर यास जोरदार ठोस दिली. दरम्यान त्या ठिकाणी गर्दीत जमा झालेल्या लोकांनी अॅम्बुलन्स च्या सहाय्याने त्यास रुग्णालयात दाखल केले . अभिषेक यास डोक्यावर, गुप्त अंगावर दुखापत झाल्याने औषध उपचार करताना त्याचे निधन झाले . चंद्रशेखर पुरुषोत्तम येवलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालक सुनील गुलाबराव देसले व वाहना वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






