चूरू : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एका 25 वर्षीय महिलेनं आणि तिच्या प्रियकरानं पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केलीय. महिला व तिचा प्रियकर हे सध्या लिव्ह-इनमध्ये राहत असून, त्यांनी पोलिसांसमोर त्यांची माहिती दिली, तेव्हा सुरक्षा मागण्यामागचं कारण स्पष्ट झालं.राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात राहणाऱ्या दोघांनी स्वसंरक्षणासाठी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असं त्यांनी सांगितलं. चुरू जिल्ह्यातल्या बूंटिया गावात ते राहतात.
कंचन (25) नावाच्या महिलेचं नऊ वर्षांपूर्वी अजितसर गावातल्या गिरीधारी याच्याशी लग्न झालं आहे; मात्र तिला तिचा पती आवडत नाही. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते. कंचनच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा लग्नानंतर एका वर्षाने दुसऱ्या शहरात कामासाठी निघून गेला. तो कामासाठी सतत बाहेर असायचा.याचीच परिणती त्या दोघांच्या नात्यामधलं प्रेम कमी होण्यात झाली. त्याच वेळी चुलत सासऱ्यांचा मुलगा मनोज याच्याशी कंचनची ओळख झाली.
मनोज पिकअप ड्रायव्हर आहे. दोघांमध्ये मैत्री वाढली व त्याचं रूपांतर प्रेमात झालं. दरम्यानच्या काळात कंचनला एक मुलगीदेखील झाली. नवऱ्यासोबत मात्र तिचे वाद सातत्यानं सुरू होते. 23 मार्चला तिच्या कुटुंबीयांना त्यांचं प्रेमप्रकरण समजलं. त्यामुळे त्या दोघांनी त्याच रात्री घरातून पळून जायचं ठरवलं. कंचन तिच्या मुलीला घेऊन रात्री घराबाहेर पडली, तिथे मनोज बाइक घेऊन थांबला होता.बाइकवरून ते रतनगडला आले. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांना कंचन व तिची मुलगी घरात नसल्याचं समजलं. त्यांनी त्यांचा पाठलाग करून शोध घेतला. कुटुंबीयांपासून लपण्यासाठी कंचन, तिची मुलगी आणि मनोज गेल्या पाच दिवसांपासून शेतांमध्ये लपून छपून राहत आहेत.
सासर आणि माहेरच्यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे अखेर त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात धाव घेतली.नवऱ्यासोबत राहायचं नसून दीरासोबतच संसार करायचा असल्याचं कंचनने सांगितलं. तिने पोलिसांना तिची सगळी कहाणी सांगितली व जिवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे संरक्षण देण्याची विनंती केली. आपण स्वतःच्या मर्जीने मुलीला घेऊन मनोजकडे आल्याचं कंचनने सांगितलं. सासरच्या व इतर कुटुंबीयांपासून आपल्या व मनोजच्या जिवाला धोका असून त्यापासून संरक्षण द्यावं असं तिनं पोलिसांना सांगितलंय.
हे पण वाचा
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.४ फेब्रुवारी २०२५