एका महिलेचे 16 वर्षीय अल्पवयीन भाच्यासोबत लैंगिक संबंध; महिला झाली गर्भवती, पुढे काय?झालं वाचा.

Spread the love

सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात उत्तराखंडच्या देहराडूनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला आपल्या अल्पवयीन भाच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते.

देहराडून : सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात उत्तराखंडच्या देहराडूनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला आपल्या अल्पवयीन भाच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते. त्यातून ती गर्भवती झाल्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,

महिलेला पोक्सो कोर्टाने 20 वर्षांच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षेसह दहा हजारांचा दंडही सुनावला.देहराडूनच्या 16 वर्षीय अल्पवयीन भाच्यासोबत सावत्र आत्याने लैंगिक संबंध ठेवले होते. ही महिला भाच्याला घेऊन पळून गेली होती. जेव्हा ती परत आली, तेव्हा ती गरोदर होती. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करत आरोपी महिलेला अटक केली. मात्र, गरोदर असल्याने तिला जामीन देण्यात आला.

महिलेने आपल्या भाच्यापासून एका मुलीला जन्म दिला. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने 5 जुलै 2022 रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. आरोपी महिला आपल्या पतीसोबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या माहेरी येऊन राहत होती. पण तेव्हा महिलेच्या पोटात बाळ असल्याने ती जामिनावर बाहेर होती. अखेर या महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर तिला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार