पुणे :- विवाहित महिलेसोबत मैत्री करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तिचे खासगी फोटो व्हायरल (Nude Photo) केले.याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत विमाननगर आणि धानोरी येथे घडला आहे.याबाबत 30 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि.26) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार फकीरा उर्फ करण रामदत्त शर्मा वय-35 रा. धानोरी) व 30 वर्षीय महिले विरुद्ध आयपीसी 376, 376/2/एन, 376/जे, 323, 352, 504, 506, 34 सह अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी यांची डिसेंबर 2023 मध्ये ओळख झाली.आरोपीने महिलेसोबत मैत्री करुन तिच्यावर विमाननगर आणि धानोरी येथे जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित महिलेने आरोपीला विरोध केला असता जातीवाचक शिवीगाळ केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी यांची डिसेंबर 2023 मध्ये ओळख झाली.आरोपीने महिलेसोबत मैत्री करुन तिच्यावर विमाननगर आणि धानोरी येथे जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित महिलेने आरोपीला विरोध केला असता जातीवाचक शिवीगाळ केली. तर आरोपी महिलेने धमकी देऊन तिचे खासगी फोटो ओळखीच्या लोकांच्या मोबाईलवर पाठवून फिर्य़ादी यांचीफसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






