VIDEO पुणे :- रेल्वे स्थानक परिसरातून ७ महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.श्रावण अजय तेलंग, असे अपहरण झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अजय तेलंग यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंग दाम्पत्य मूळचे भुसावळचे असून ते पुण्यात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. शनिवारी मध्यरात्री तेलंग दाम्पत्य पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने तेलंग यांचा ७ महिन्यांचा मुलगा श्रावण याला उचलून नेले. तेलंग दाम्पत्याला जाग आली. तेव्हा श्रावण जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध घेतली असता, तो कुठेही दिसून आला नाही. यानंतर घाबरलेल्या तेलंग दाम्पत्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. यामध्ये ७ महिन्यांच्या श्रावणचे अपहरण करणारी व्यक्ती दिसून आली.पोलिसांनी या व्यक्तीचा शोध सुरू केला असून स्टेशन परिसरातील रिक्षाचालक, उपहारगृहचालक, फेरीवाल्यांकडे चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बंडगार्डन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……