अमळनेर : अल्पवयीन मुलीला बोलावून बळजबरीने प्रेम केले नाही, तर भावाला काहीही करून टाकू, अशी धमकी देणाऱ्या तालुक्यातील पिंपळी येथील तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.पिंपळी येथील सातवीत जाणारी १२ वर्षांची मुलगी २९ एप्रिलला सायंकाळी साडेसातला ओट्यावर बसली असताना. भावेश हनुमंत महाजन (वय १८) व इतर दोन विधीसंघर्ष बालके गल्लीतून जात असताना, भावेशने तिला माझ्या मागे ये, म्हणून बोलावले. मुलीने हा प्रकार आईवडिलांना सांगितला. वडिलांनी तिला त्यांच्यासोबत जायला सांगितले.
मुलगी एकाच्या गुदामाजवळ गेली. तेव्हा भावेश तिला ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, माझे प्रपोज ऍक्सेप्ट कर नाही, तर मी तुझ्या भावाला काहीही करेल’, अशी धमकी दिली. दोघी अल्पवयीन मुलांनी ‘तू त्याचे प्रपोज ऍक्सेप्ट कर’, असे मुलीला सांगितले.मुलीच्या वडिलांनी हे ऐकल्यावर मुलीला घरी पाठविले. नंतर तिघांनी मुलीच्या वडिलांशी वाद घातले. यापूर्वीही मुलगी शिवमंदिरात जात असताना, तिघे मंदिरावर बसले असायचे, म्हणून मुलीने मंदिरात जाणे बंद केले होते. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






