पुणे : लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करुन तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडित मुलीने बुधवारी (दि.०१) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरून मुलीच्या आईसह अविनाश शेळके, गोविंद काकडे (दोघे रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मार्च २०२४ मध्ये पीडित मुलीच्या घरी व आरोपीच्या राहत्या घरी घडला आहे. पीडिता ही एका कापड दुकानात काम करते.
दुकानात काम करत असताना आरोपी अविनाश शेळके याच्यासोबत तिची ओळख झाली. अविनाश याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने शारीरिक संबंध ठेवताना तिचे न्युड फोटो मोबाईलमध्ये काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार तीच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, आईचा मित्र गोविंद काकडे याने पीडित मुलीसोबत अश्लील वर्तन केले. तसेच ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन घरी येऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
याबाबत पीडित मुलीने आईला सांगितले. त्यावेळी आईने गोविंद याचे नाव कोठेही घेयचे नाही असे सांगून मुलीला बेदम मारहाण केली. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊ दिली नाही. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






