अमळनेर : नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या एका विद्यार्थिनीने अमळनेर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भालेराव नगरात घडली.या तरुणीच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.निकिता रवींद्र पाटील (वय १९) असे मयत तरुणीचे नाव असून ती मुख्य बाजार पेठेतील साने गुरुजी संकुलात प्रसिद्ध असलेल्या रामभाऊ चहावाले (लिबर्टी टी) चे संचालक रवींद्र रामकृष्ण पाटील यांची कन्या होती.
भालेराव नगरात त्यांचे घर असून सोमवारी दुपारी साडेबारा वाजता ती व तिची आई घरात दोघेच असताना निकिताने तिच्या रूममध्ये छताच्या पंख्याला गळफास घेतल्याने तिची प्राणज्योत मालवली. अर्ध्या तासाने ही घटना तिच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मोठा आक्रोश केला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.पोलीस पंचनाम्यानंतर काल सायंकाळी अमळनेर ग्रामिण रुग्णालयात तिचे शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, निकिता ही अत्यंत गुणी तरुणी होती. साने गुरुजी विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथे पॉलिटेक्निक डिप्लोमाला तिने प्रवेश घेतला होता. गत वर्षी अखेरच्या वर्षाला असताना नुकतीच ती परीक्षा दिल्यानंतर सुट्या लागल्याने अमळनेरात आली होती. शनीपेठ येथे तिच्या काकांकडे नुकत्याच झालेल्या विवाह सोहळ्यात देखील निकिताने आनंदात मौजमजा ही केली होती. असे सारे काही अलबेल असताना तिने आत्म्याहत्येसारखा कठोर निर्णय का घेतला, याचे कारण मात्र गुलदस्त्यात राहिले आहे.
या घटनेने तिच्या कुटुंबास मोठा धक्का बसला आहे. या घटनेने शनीपेठ व भालेराव नगर परिसरात शोकळला पसरली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम