चाळीसगाव :- तालुक्यातील रोहिणी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निघृण खून केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भारताबाई कैलास गायकवाड (३३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती कैलास एकनाथ गायकवाड (३८, रा. ओझर, ता. चाळीसगाव) याला पोलिसांनी अटक केली.
चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील रहिवासी कैलास गायकवाड हा पत्नी भारताबाई हिच्यासोबत कामानिमित्ताने रोहिणी या गावी राहत होता. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद व्हायचे. इतकेच नाही तर कैलास हा पत्नी भारतबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत तिच्यासोबत वाद घालायचा. तसेच तिचा छळ करायचा. दरम्यान ५ एप्रिलला रात्री भारताबाई ही पती कैलास गायकवाड व मुलगी योगिता यांच्यासह घरात झोपली होती. यावेळी कैलासने दगड डोक्यात टाकून भारताबाई हीचा खून केला. यानंतर तो फरार झाला होता.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. भारताबाई हिचा भाऊ गणेश माळी याने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी हे रात्रीच्या गस्तीवर होते. रोहिणी गावात त्यांनी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी काही तरुणांनी त्यांना या खुनाची माहिती दिली. मारेकरी पती चाळीसगावच्या दिशेने पळाल्याचे सांगताच परदेशी यांनी मुलांना गाडीत बसवून मारेकरी कैलास गायकवाड याचा शोध सुरु केला. तसेच चाळीसगाव पोलिसांच्या डी. बी. पथकाची मदत घेत मारेकरी कैलास गायकवाड याला शोधून ताब्यात घेतले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






