भोजपुर : सध्या लग्नसराई सुरू आहे. यातच आता एका लग्नाची अजब कहाणी समोर आली आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. वरमाला घातल्यानंतरही तीन दिवस लग्नाचे प्रयत्न केल्यानंतर चौथ्या दिवशी वधूला स्विकारले.दोन्ही बाजूचे नातेवाईक प्रयत्न करुन थकल्यावर शेवटी पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.
नेमकं काय घडलं –
ही घटना आरा रामपूर येथील आहे. 28 एप्रिल रोजी चातर गाव येथील पक्षी पासवान यांचा मुलगा सूरज पासवान याची वरात रामपूर गावातील शंकर पासवान यांची घरी आली. याठिकाणी त्यांची मुलगी बेबी कुमारीसोबत त्याचे लग्न होणार होते. आनंदात वरात याठिकाणी आली. वरमालाही घालण्यात आली. मात्र, त्याचवेळी वधूचे काका आणि वराचा भाऊ या दोघांमध्ये वाद झाला. मारहाणीपर्यंत हे प्रकरण पोहोचले. यानंतर रागाच्या भरात वराने वऱ्हाडींसोबत मंडप सोडत लग्न पूर्ण न करता फरार झाला.
यानंतर मुलीकडच्या लोकांनी तसेच ज्या लोकांनी हे लग्न जुळवले होते, त्या सर्व लोकांनी लग्न पार पाडण्याची विनंती केली. मात्र, तरीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अनेक प्रयत्नांनंतर मुलाकडच्या लग्नासाठी होकार दिला. मात्र, एक नवीन अट समोर ठेवली. ते म्हणाले की, आमच्या गावाजवळ लाहौंग बाबा मठिया यांच्या मंदिरात यावे. याठिकाणी हे लग्न होईल. सांगितल्यानुसार, दुसऱ्या दिवशी 29 एप्रिल रोजी मुलीकडचे लोक मंदिरात पोहोचले. मात्र, मुलाकडचे लोक आले नाहीत. पुन्हा त्यांना विनंती करण्यात आली.
यानंतर वरपक्षाने पुन्हा 5 मे रोजी त्याच्याच गावातील मंदिरात लग्नासाठी बोलावले. मात्र, यावेळीही वर लग्नासाठी आला नाही. यानंतर मात्र, वधूने थेट आपल्या कुटुंबीयांना सोबत पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेतली. वर मुलगा तत्काळ पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यांनी वर आणि त्याच्या कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खाक्या दाखवताच वर सूरज हा लग्नासाठी तयार झाला आणि शेवटी हा लग्नसोहळा पार पडला. पोलिसांच्या उपस्थितीत बखोरापुर मंदिरात हे लग्न झाले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






