यावल :- तालुक्यातील डांभुर्णी गावी शेतात रोटावेटर करीत असताना ड्रायव्हरच्या मागच्या साईडला तोल जाऊन रोटाव्हीटर मध्ये अटकून शरीराचे तुकडे तुकडे झाले ही घटना 14 मे 24 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
डांभुर्णी तालुका यावल येथील विजय जानकीराम कोळी बाविस्कर वय 35 हा रोटाव्हीटर करण्यासाठी शेतात गेलेला होता दिनांक 14 मे 24 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मागील बाजूस रोटाव्हीटर मध्ये अटकून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले याबाबत केतन रेवा पालक यांनी दिलेल्या खबर वरून यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नंबर 27 2004 सीआरपीसी 174 नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल मराठे करीत आहेत
सदर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी आणण्यात आला या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यावल ग्रामीण रुग्णालय यांनी शिवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला व अत्यंत शोकाकुल परिस्थितीमध्ये डांभुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मयत विजय कोळी यांच्या पश्चात आई वडील भाऊ वहिनी असा परिवार आहे
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा