आज पासून एरंडोल येथे जय श्रीराम प्रतिष्ठान तर्फे हनुमान कथेचे आयोजन

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल: शहरात जय श्रीराम प्रतिष्ठान तर्फे सालाबादाप्रमाणे जय श्रीराम चौक बुधवार दरवाजा परिसरात यावर्षी श्रीमद हनुमंत कथेचे आयोजन, कथेची सुरुवात दिनांक 2 एप्रिल गुढीपाडव्याच्या नववर्ष प्रारंभापासून होत आहे. खत्री ची सांगता दिनांक 11 एप्रिल रोजी होणार आहे. याच दिवशी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. कथेची वेळ सायंकाळी ७.३० ला आहे.

कथा वाचक श्रद्धेय भागवताचार्य राजीव कृष्ण जी महाराज झा मिथिला निवासी जनक पुरी धाम यांच्या सुमधुर वाणीतून खात्याचे विवेचन होणार आहे.
दिनांक 5 एप्रिल रोजी सामाजिक बांधिलकी म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक सहा एप्रिल रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोफत मधुमेह तपासणी, मोफत पोटाचे विकार तपासणी, मोफत हाडांची तपासणी, बाल रोग तज्ञ या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्स तपासणी करणार आहेत
तरी रक्तदान, आरोग्य शिबिर, व कथा श्रावणाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे जय श्रीराम प्रतिष्ठान तर्फे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

टीम झुंजार