अंजनी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा.एरंडोल शहरासह दहा गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती.

Spread the love

संजय चौधरी मुख्य संपादक झुंजार न्युज. एरंडोल :- शहरासह ग्रामीण भागातील दहा गावांना पाणी पुरवठा करणा-या पळासदड (ता.एरंडोल) येथील अंजनी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा असल्यामुळे आगामी काळात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अंजनी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा असल्यामुळे नागरिकांनी पाणी वाया
जाणा नाही याची दक्षता घेवून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.शहरासह ग्रामीण भागातील कासोदा,फरकांडे, जळू,नांदखुर्द बुद्रुक आणि खुर्द,धारागीर,विखरण,बांभोरी खुर्द आणि बुद्रुक,टोळी खुर्द या गावांना अंजनी प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येतो.

सद्यस्थितीत प्रकल्पात केवळ चार टक्के उपयुक्त जलसाठा असून वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे.प्रकल्पातील अत्यल्प जलसाठ्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील दहा गावांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची
शक्यता आहे.यापूर्वी अंजनी प्रकल्पातून अंजनी नदीच्या पात्रात सुमारे पंधरा ते वीस दिवस पाणी सोडण्यात आले होते.त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया गेले. प्रकल्पातून पुन्हा पाणी सोडण्याचे नियोजन
प्रशासनातर्फे केले जात असल्याची माहिती समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,दशरथ महाजन
यांना समजताच त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून पाणी सोडण्यात येवू नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला आहे.

सद्यस्थितीत शहरात सहा ते सात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असून महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाण्याची समस्या निर्माण झाली असतांना देखील शहरातील अनेक खासगी आणि सार्वजनिक नळांना तोटया नसल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.पाण्याचा अपव्यय करणा-यांविरोधात पालिकेने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील सात वर्षांपासून अंजनी प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होत होता,मात्र मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा झाला नव्हता.यावर्षी पावसाळा लांबल्यास संपूर्ण तालुक्यात पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीसह काम पूर्ण झाले आहे मात्र वाढीव उंचीत बुडीत होणा-या गावांचे पुनर्वसन न झाल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करता येत नाही.वाढीव उंचीत बुडीत होणा-या गावांचे पुनर्वसन झाल्यास तसेच शेतक-यांना नुकसान भरपाई
मिळाल्यास प्रकल्पात पूर्ण जलसाठा होऊन एरंडोल आणि धरणगाव शहरास ग्रामीण भागातील अनेक गावातील पाण्याची समस्या दूर होऊन हजारो एकर क्षेत्र
ओलिताखाली येणार आहे.याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.दरम्यान प्रकल्पातील अत्यल्प जलसाठा लक्षात घेवून नागारीकानी पाण्याचा जपून वापर करून पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार