इंदापूर तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्ती करिता २ कोटी २० लक्ष निधी मंजूर -राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी-संतोष कदम
इंदापूर :
इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजातील नागरिकांच्या प्रमुख मागण्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होत्या त्यांच्याकडून वारंवार मागणी होत असल्याकारणाने इंदापूर तालुक्यातील २ कोटी २० लक्ष निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये अल्पसंख्यांक वस्तीमध्ये रस्ते करणे, जारत सभामंडप, शादीखाना बांधणी , ईदगाह मैदान करिता संरक्षक भिंत बांधणे, कब्रस्तान सुशोभिकरण करणे आदी कामे करण्यात येतात.

याप्रमाणे भिगवण येथील भिगवण स्टेशन येथे कब्रस्तान अंतर्गत रस्ता १५ लक्ष, भिगवण मज्जित सुशोभिकरण करणे ५ लक्ष, कबरस्तान संरक्षक भिंत बांधणे १० लक्ष, वडापूरी येथे कब्रस्तान दुरुस्ती करणे ३० लक्ष, पिंपरी बुद्रुक येथील जारत सभामंडप बांधणे ५ लक्ष, पिंपरी बुद्रुक येथे ईदगाह भिंत बांधणे ५ लक्ष, पिंपरी बुद्रुक येथे ओझरे रस्ता ते कब्रस्तान रोड कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष, पळसदेव येथे कब्रस्तानात संरक्षक भिंत बांधणे १५ लक्ष, शेळगाव येथील कब्रस्तान अंतर्गत रस्ता १० लक्ष, निमगाव येथे कबरस्तान संरक्षक भिंत बांधणे १० लक्ष, निमगाव येथे दफनभूमी कडे जाणारा रस्ता २० लक्ष, सणसर येथे कब्रस्तान संरक्षण भिंत १५ लक्ष, बेलवाडी येथे कब्रस्तान अंतर्गत रस्ता १० लक्ष, लासुर्णे येथे शादीखाना २० लक्ष, कुरवली येथे कब्रस्तानात ईदगाह मैदान १० लक्ष, सराफवाडी येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे १५ लक्ष, वरकुटे येथे कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे १५ लक्ष, आदी विकास कामांना निधी देण्यात आला आहे.

टीम झुंजार