जळगाव :- पैशांसाठी आजीचा खून करणाऱ्या नातवास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासात अटक केली आहे. मांजाबाई दगडु भोई, (वय 80) रा. पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा असे मयत वृद्ध महिलेचे तर विशाल प्रभाकर भोई असे संशयित मारेकरी तरुणाचे नाव आहे.विशाल हा मयत मांजाबाईच्या बहिणीचा नातू आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. डोक्यावर झालेले कर्ज कमी करण्यासाठी आपण आजीचा गळा दाबून खून केल्याचे संशयित आरोपी विशाल भोई याने पोलिसांजवळ कबुल केले आहे.
आजीच्या हत्येनंतर तिच्या हातातील चांदीच्या गोटपाटल्यापैकी एक गोटपाटली व कानातील सोन्याच्या बाळया काढून घरात असलेल्या पोत्यामध्ये त्याने मृतदेह भरुन ठेवला. त्यानंतर मागच्या दरवाज्याने बाहेर निघून मोटार सायकलने अजिंठा गाठले. अजिंठा येथील एका सराफी दुकानात त्याने त्या वस्तू विकून रक्कम मिळवल्याची कबुली विशाल भोई याने पोलिसांना दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत हा प्रकार उघड झाला.
विशाल यास पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सफौ विजयसिंग पाटील, हे. कॉ. लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, अकरम शेख, महेश सोमवंशी तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे.कॉ. रणजीत पाटील, जितेंद्र पाटील, दिपक आहिरे आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४