नाशिक :- ‘मी माझ्या घरच्यांमुळे आत्महत्या करत आहे. आई, वडिलांनी माझे लग्न माझी इच्छा नसताना केले आहे. माझे वय १८ वर्ष पूर्ण नसताना लग्न करून देण्यात आले आहे. मला माझे ज्या व्यक्तीवर प्रेम होते या व्यक्तीसोबत लग्न करायचे होते.माझ्या मरणाचे कारण माझी आई, नवरा, सासू या तीन व्यक्ती आहेत. त्यांच्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे मृत्यूपूर्वी सुसाईड नोटमध्ये लिहून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नवीन नाशिकमधील एमआयडीसी अंबड पोलीस चौकीच्या हद्दीत गुरुवारी (दि. ९) एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करीत प्राथमिक चौकशी पोलिसांकडून करण्यात आली.पोलिसांना पंचनामा करताना तिच्या साडीमध्ये सुसाईड नोट आढळून आली. त्यामध्ये तिने लिहिलेल्या मजकुरावरून जानेवारी महिन्यात तिच्या इच्छेविरुद्ध पालकांनी जळगाव जिल्ह्यात तिचे लग्न लावून दिले होते.
त्यामध्ये नमूद केलेल्या वयाची खात्री पोलिसांनी पटविण्यासाठी भडगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांकडून शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत प्राप्त केली. या दाखल्यात पीडित मुलीचे जन्म वर्ष २००७ लिहिल्याचे समोर आले. त्यानुसार लग्नाच्या वेळी तिचे वय १६ वर्षे ९ महिने १३ दिवस इतके होते, असे पोलिस उपनिरीक्षक अतुल पाटील (३५) यांनी सरकार पक्षाकडून दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
मयत मुलीच्या पतीविरुद्ध बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह तसेच आई, वडील, सासू, सासरे यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिचे आई, वडील, सासू, सासरे व पती यांनी तिला मानसिक त्रास देत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न होत असल्याचेही फिर्यादीत म्हटले असून, त्या कलमांन्वयेही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……