अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला दोन्ही बाजूला लोखंडी खिळ्यांनी छिद्र पाडून पतीने कुलूप लावल्याची मानवतेला काळिमा फासणारी अतिशय संतापजनक घटना वाकड परिसरातून समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड :- पाच दिवस पत्नीने हा सगळा प्रकार सहन केला. त्यानंतर वेदना असह्य झाल्यावर तिने नणंदेला घडलेला प्रकार सांगितल्यावर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये महिलेवर शस्त्रक्रिया करून हे कुलूप काढण्यात आले आहे. वाकड येथे शनिवारी (दि. ११) घडलेला हा अमानवीय प्रकार गुरुवारी (दि. १६) उघडकीस आला. नराधम पतीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. वाकड भागात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या ३० वर्षीय पतीने हे अमानवी धक्कादायक कृत्य केले असून, त्याच्या २८ वर्षीय पत्नीने याबाबत फिर्याद दिली आहे.
हे दाम्पत्य मूळचे नेपाळ येथील असून, नोकरीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यासाठी आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पती वारंवार तिला मारहाण करत होता. ११ मे रोजी रात्री कामावरून आल्यानंतर पतीने चाकूच्या धाकाने नेहमीप्रमाणे पत्नीला पुन्हा चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केली. यावेळी त्याने घरातील ओढणीच्या साहाय्याने पत्नीचे हात पाय बांधले. त्यानंतर तिच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले. अमानुषपणे हा प्रकार करीत असताना नराधम पतीने लोखंडी खिळे घेऊन पत्नीच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूने छिद्र केली. त्यानंतर पितळी कुलूप आणून त्याने पत्नीच्या गुप्तांगावर हे कुलूप लावून किल्ली फेकून दिली.पोटच्या तीन मुलांकडे बघून जखमी अवस्थेतील पत्नीने हा प्रकार कोणालाच सांगितला नाही.
मात्र, पाच दिवस लोखंडी खिळे शरीरात तसेच राहिल्याने पत्नीला असह्य वेदना होऊ लागल्या. तिची शुद्ध हरपू लागली. ते व्हा घराशेजारी राहणाऱ्या नणंदेला बोलावून घेत घडलेला सर्व प्रकार कथन केला. पीडित महिलेचे अन्य नातेवाईक चिंचवडगाव परिसरात राहात असून आपल्याच भावाने केलेल्या अमानुष कृत्याची माहिती तिने भावजईच्या माहेरच्यांना कळविली.पीडित महिलेचे चुलते आणि अन्य नातेवाईक वाकडमध्ये आले. त्यांनी जखमी अवस्थेतील महिलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) उपचारासाठी दाखल केले. हा धक्कादायक आणि अमानवीय प्रकार पाहिल्यानंतर वायसीएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केले.
तेव्हा तिचा पतीदेखील तेथे उपस्थित होता. हॉस्पिटलमधून याबाबतची माहिती हिंजवडी पोलिसांना सुरुवातीला देण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून हिंजवडी पोलिसांनी वायसीएम हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. डॉक्टरांनी सांगितलेला सर्व प्रकार ऐकल्यानंतर हिंजवडी पोलिसांना क्षणभर यावर विश्वास बसला नाही. नंतर त्यांनी नराधम पतीला ताब्यात घेऊन वाकड पोलिसांच्या हवाली केले.पतीने कुलूप लावल्यानंतर त्याची किल्ली कुठेतरी फेकून दिली होती.
वायसीएममधील डॉक्टरांनी शहरातील अन्य काही वरिष्ठ डॉक्टरांची संपर्क करून शुक्रवारी दुपारी महिलेवर शस्त्रक्रिया करून कुलूप आणि खिळे शरीरापासून वेगळे केले. सध्या महिलेवर वायसीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी (दि. १७) दुपारी या घटनेची माहिती राज्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नागरिकांमधून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या दाम्पत्याच्या तिन्ही मुलांना महिलेच्या माहेरकडील नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले असून पतीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वाकड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
चौकट:-
वाकड परिसरात ११ मे रोजी हा प्रकार घडला आहे. पत्नीने नातेवाईकांना १६ मे रोजी याची माहिती दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला असून, पतीला अटक करण्यात आली आहे.
– निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४