रावेर :- तालुक्यातील सावदा येथून जवळच असलेल्या चिनावल या गावात १७ मे रोजीच्या संध्याकाळच्या सुमारास काही समाजकंटकांनी महादेव वाडा, महाजन वाडा, वानगल्ली आदी परिसरात तुफान दगडफेक केली. कारण तर किरकोळ होतं, मग इतकी अचानक दगडफेक, या बाबत अनेक शंका कुशंका निर्माण होतात. झालेल्या या दगडफेकीत काही गाड्यांचे सुद्धा नुकसान झाले. महिलांच्या विनयभंगासह त्यांचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र सुद्धा हिस्कावले. या अचानक झालेल्या दगडफेकीने ग्रामस्थ भयभीत झाले. या प्रकाराला आळा बसावा व दोषी समाजकंटकांवर कारवाई व्हावी यासाठी गावातील शेकडो महिला व पुरुष यांनी चीनावल बस स्थानक वरील पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
शेवटी समाजकंटकांवर कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु या वेळी १७ मे च्या मध्यरात्री पासून तर २० मे च्या मध्यरात्री पर्यंत गावात संचारबंदी जरी करण्यात आली. सावदा पोलिस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. गेले तीन दिवस गावात सर्वत्र शुकशुकाट आहे. जनजीवन विस्कळित संचारबंदी लागू करण्यात आल्याने गावातील संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्व किराणा दुकाने, इतर दुकाने, अस्थापने आदी सर्व व्यवहारच बंद असल्याने गावात सर्वत्र शुकशुकाट आहे. १९ मे रोजी संध्याकाळी एक तासा साठी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती.
चिनावल हे गाव शेतकऱ्यांचे गाव, येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून संचारबंदी काळात सर्व शेती कामे व व्यवहार ठप्प झाल्याने गावकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गावात बंदोबस्तासाठी कुठलीही अघटीत घटना घडू नये यासाठी गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याने गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यात सावदा, फैजपूर, निंभोरा, रावेर, येथील पोलिस बळ, राज्य राखीव पोलिस दल यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुठभर समाजकंटकांना साठी संपूर्ण गावासह प्रशासन वेठीस गावातील काही समाजकंटकांनी संपूर्ण गावातील ग्रामस्थ, पोलिस प्रशासनासह संबंधित सर्व प्रशासनाला सुद्धा वेठीस धरलं आहे. या समाज कंटकांवर सक्त कारवाई होणे गरजेचे आहे. व्हायलाच पाहिजे. पोलिस आपला तपास करतीलच, पण या समाजकंटकांच्या नांग्या ठेचल्याच पाहिजे जेणे करुन असले प्रकार पुन्हा घडणार नाही.