कर्जास कंटाळून विषारी पदार्थ प्राषण केलेल्या किनगाव येथील ५२ वर्षीय शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू.

Spread the love

यावल :- तालुक्यातील किनगाव येथील ५२ वर्षीय शेतकऱ्याने गेल्या आठवड्याभरापुर्वी कर्जास कंटाळून विषारी पदार्थ प्राषण केले होते व त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते उपचारा दरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला तेव्हा या बाबत जळगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.बॅक, विकास सोसायटी चे त्यांच्यावर कर्ज होते व शेताच्या नापिकीमुळे ते कर्ज बाजारी झाले होते.

किनगाव ता.यावल येथील ग्रामपंचायतचे माजी सदस्य राजेेंद्र धुडकू पाटील वय ५२ या शेतकऱ्याकडे दोन एकर बागायती शेती क्षेत्र आहे. व त्याव्दारे त्यांचे उदरनिर्वाह चालायचेे तर गेल्या काही वर्षापासुन मुलगा व मुलगीचे शिक्षण तसेच विवाह यांच्यावर पैसे खर्च झाले आणी शेतातुन पाहिजे तसे उत्पन्न मिळाले नाही. यातचं बँकेचे आणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत राजेंद्र पाटील हे होते याच नैराश्यातुन त्यांनी गेल्या आठवड्याभरापुर्वी किनगावात राहत्या घरात विषारी पदार्थ प्राषण केले

हा प्रकार निर्दशनास येताच त्यांना जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले येथ व नंतर खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालले. तर शुक्रवारी सकाळी ११ वाजेला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी जळगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन असा परिवार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार