अमळनेर तालुक्यातील मालपूर येथील घटना, मारवाड पोलिसात गुन्हा दाखल.
अमळनेर :- शेतात जाणाऱ्या रस्त्यात मुरूम टाकण्याच्या कारणावरून आणि जुने भांडणामधून वाद निर्माण करत लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी १९ मे रोजी दुपारी ४.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर विनायक पाटील (वय-४७, रा. मालपुर ता. अमळनेर) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्रभाकर विनायक पाटील हे पत्नी उज्वलाबाई पाटील यांच्यासह अमळनेर तालुक्यातील मालपुर गावात वास्तव्याला आहे.
त्यांच्या गावात राहणारे काही जणांसोबत त्यांचा जुना वाद होता. तसेच शेतातील रस्त्यावरून वाद सुरू होता. दरम्यान दि. १९ मे रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शेतातील रस्त्यावर मुरूम टाकण्याच्या कारणावरून ज्ञानेश्वर लहू पाटील, राजेंद्र लहू पाटील, दिलबर लहू पाटील, रुपेश ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी भगवान पवार, लहू यादव पाटील, सुनंदा राजेंद्र पाटील आणि निर्जला राजेंद्र पाटील या ८ जणांनी लाकडी दांडक्याने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले प्रभाकर पाटील यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान घटना घडल्यानंतर मारेकरी पसार झाले. याप्रकरणी प्रभाकर पाटील यांची पत्नी उज्वलाबाई पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११ वाजता संशयित आरोपी ज्ञानेश्वर लहू पाटील, राजेंद्र लहू पाटील, दिलबर लहू पाटील, रुपेश ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी भगवान पवार, लहू यादव पाटील, सुनंदा राजेंद्र पाटील आणि निर्जला राजेंद्र पाटील यांच्या विरोधात मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार नाईक हे करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






