आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्र्यात एका चप्पल व्यावसायिकाच्या घरी आयकर विभागानं छापेमारी केली. यामध्ये दंग करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. या छापेमारीत प्रत्येक ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलवर विशिष्ट चिन्ह दिसून आले आहेत, त्यामुळं पोलीसही चक्राऊन गेले आहेत.आग्र्यातील हरमिलाप ट्रेडर्सच्या रामनाथ डंग यांचा चप्पल आणि बुटांसाठीचं विशिष्ट मटेरियलचा मोठा उद्योग आहे. गेल्या २० वर्षात त्यांनी बेहिशोबी संपत्ती कमावल्याची खबर आयकर विभागाला मिळाली होती.
जेव्हा आयकर विभागाच्या टीमनं या व्यावसायिकाच्या घरावर छापेमारी केली तेव्हा त्याच्या घरात ६० कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम आढळून आली. सध्या नोटांची मोजणी सुरु आहे. पण विशेष म्हणजे केवळ ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल या व्यावसायिकाकडं कुठून आले आणि हे बंडल ज्या पद्धतीनं बांधले आहेत त्याची ठेवण एकसारखी आहे.
नोटांच्या बंडलमध्ये काय आहे विशेष?
छापेमारीत मिळालेल्या ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलांवर कागदी स्लीप एकसारख्याच पद्धतीनं लावलेली आहे. तसेच या नोटांवर लावलेला रबर देखील एकसारख्या प्रकारे आणि एकाच रंगातील आहेत. त्यामुळं यामागे काहीतरी विशेष योजना असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळं खरंतर पोलीसही चक्रावून गेले आहेत
व्यावसायावर परिणाम होणार?
आयकर विभागानं केलेल्या या कारवाईमुळं आणि त्यात खोऱ्यानं पैसा आढळल्यानं स्थानिक भागातील चप्पल व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. व्यावसायिकांचं म्हणणं आहे की याचा थेट परिणाम आमच्या व्यवसायावर होणार आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






