छत्रपती संभाजीनगर :- प्रेमविवाह करणाऱ्या मुलीचा खून करून शीर धडावेगळं करणाऱ्या मायलेकांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल तीन वर्षानंतर वैजापूर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे.शोभा मोटे आणि संकेत मोटे असं शिक्षा झालेल्या मायलेकांची नावे आहेत.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे ४ डिसेंबर २०२१ मध्ये ऑनर किलिंगची घटना घडली होती. कुटुंबियांचा विरोध डावलून गोयेगाव येथील किशोरी अविनाश थोरे या १९ वर्षीय तरुणीने एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता.
प्रेमविवाहनंतर किशोरी आपल्या पतीसह लाडगाव येथे राहत होती. मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे आपली समाजात बदनामी झाली. असं किशोरीच्या आई आणि भावाला वाटत होतं. याच रागातून आरोपींनी लाडगाव गाठलं.आई आणि भाऊ राग विसरून आपल्याला भेटायला आल्याने किशोरीला आनंद झाला. ती चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये गेली. घरात कुणी नसल्याची संधी साधत आरोपी शोभा आणि संकेत यांनी किशोरीवर कोयत्याने हल्ला चढवला.आरोपींनी किशोरीवर इतके क्रूरपणे वार केले, की तिचे शीर धडावेगळे केले.
यानंतर शीर हातात घेऊन सेल्फी देखील काढला. यादरम्यान तरुणीच्या पतीने पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली होती.या खटल्याची सुनावणी वैजापूर सत्र न्यायालयात पार पडली. तब्बल ३ वर्षांच्या सुनावणीनंतर कोर्टाने आपला निकाल दिला. आरोपींविरोधात सबळ पुरावे आणि साक्ष तपासल्यानंतर कोर्टाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४