चोपडा :- संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता व तंटामुक्ती पुरस्कार प्राप्त चहार्डी (ता. चोपडा) या आदर्श गावात सर्रास अवैध व्यवसाय व दारू विक्री बिनभोभाटपणे सुरू असून, दारूबंदी करावी, यासाठी गावातील कोळी वाडा, माळी वाडा भागातील काही महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सरपंच चंद्रकला पाटील यांच्याकडे मागणी केली. या वेळी चोपडा शहर पोलिस ठाणे बीट अंमलदार मधुकर पवार, पोलिस अधिकारीही उपस्थित होते. या वेळी महिलांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावातील कोळी वाडा, माळी वाडा भागातील महिलांनी गावातील दारूबंदीसाठी आग्रह केला.
गावात मोक्याचे ठिकाण झाडन चौक येथे मोकाट दारू विकली जाते. पोलिस प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा संताप व्यक्त केला. या वेळी सरपंच चंद्रकला पाटील व पोलिसांनी लवकरच दारू बंदी करण्यात येईल, असे तोंडी आश्वासन दिले. या वेळी ग्रामरोजगार सेवक बुधा भिल, उदय पाटील, मीना कोळी, सुनंदा कोळी, कल्पना कोळी, अंजनाबाई कोळी, दगुबाई रायसिंग, मीराबाई कोळी, वंदना महाजन, वैशाली महाजन, सुरेखा माळी, नीलिमा महाजन आदी महिला उपस्थित होत्या.
..यापूर्वीही ग्रामसभेत ठराव
दारूबंदी करावी, यासाठी यापूर्वीही २ ऑक्टोबर २०१५ च्या ग्रामसभेत अवैध व्यवसाय, दारुबंदीचा एकमुखी ठराव करण्यात आला होता. त्यावेळेसही तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, तात्पुरती अंमलबजावणी झाली. पुन्हा ‘जैसे थे’ झाले. नुसता ठराव, निवेदन देऊन उपयोग नाही.ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तंटामुक्ती समिती सदस्य यांनीच ही ठोस कारवाई करावी.
संपूर्ण गावातील चारही कोपऱ्यावरील अवैधरीत्या सुरू असलेले व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी केली होती. यापूर्वी दोन वेळा असा प्रकार झालेला असून, तात्पुरती कार्यवाही होते. नोटिसा दिल्या जातात. पुन्हा जैसे थे..! आदर्श गावात अवैध व्यवसाय फोफावल्याने अनेक तरुण वर्ग व्यसनाधिनतेकडे वळत आहे. याचे सोयरसुतक कुणालाच नसल्याने अखेर महिलांनी कंबर कसली आणि दारूबंदीसाठी पुढे आल्या. याची दखल गावातील लोकप्रतिनिधी, जाणकार, प्रशासन घेईल काय? हे आता पहावे लागणार आहे.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४