चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील पोलिसांनी शनिवार, दि. १८ मे २०२४ वेश्याव्यवसायाच्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे रॅकेट ३७ वर्षीय महिला के. नादिया संचालित करत होती. पोलिसांनी नादिया आणि तिच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. ही टोळी गरीब आणि मध्यमवर्गीय शाळकरी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलत होती. सर्व पीडिता ह्या नादियाच्या मुलीच्या वर्गमैत्रिणी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चेन्नईच्या वलसारवक्कम भागात घडली. शनिवारी या भागात शालेय मुलींना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीवरून कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करून एका लॉजवर छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान लॉजमधून दोन मुलींची सुटका करण्यात आली. पीडितांचे वय १७ ते १८ वर्षे दरम्यान आहे. त्याच्या चौकशीत नादियाचे नाव पुढे आले.नादिया तिच्या मुलीच्या मैत्रिणींना डान्स शिकवण्यासाठी आणि ब्युटीशियन कोर्स शिकवत होती. असे करून ती आपल्या मुलीच्या वयाच्या मुलींशी ओळख निर्माण करत. नादिया मुलींना अर्धवेळ काम करून २५ ते ३० हजार रुपये कमावण्याचे स्वप्न दाखवायची. नादियासह या व्यवसायात सहभागी असलेले अन्य आरोपी हे शिकवण्याच्या बहाण्याने मुलींना आपल्या घरी ठेवून घ्यायचे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलींना हैदराबाद आणि दिल्लीला पाठवले होते. नंतर एका मुलीने कुठेही जाण्यास नकार दिल्यास तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले जात होते. नादिया सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहक शोधत असे. यापैकी बहुतेक वृद्ध ग्राहक होते ज्यांना शाळकरी मुली हव्या होत्या.पोलिसांनी हैदराबाद आणि कोईम्बतूरमधील अशा ग्राहकांचीही ओळख पटवली आहे जे शाळकरी मुलींसाठी जास्त पैसे देण्यास तयार होते.
नादियाशिवाय पोलिसांनी ४२ वर्षीय रामचंद्र, ४३ वर्षीय सुमाथी, २९ वर्षीय माया ओली, ४३ वर्षीय जयश्री, ३१ वर्षीय अशोक आणि ७० वर्षीय रामचंद्रन यांना अटक केली आहे.अशोक कोईम्बतूरचा रहिवासी आहे, तर बाकीचे चेन्नईच्या वेगवेगळ्या भागात राहतात. या सर्व आरोपींचे मोबाईल जप्त करून तपास करण्यात येत आहे. यातील एका आरोपीची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. जिल्हा बाल विभाग पीडितांना समुपदेशन देत आहे. सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.