अहमदनगर :- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढत आलेख हा चिंताजनक आहे. विविध गुन्हेगारी कृत्य घडत असतानाच अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रमाणही चिंताजनकच आहे. आता या संदर्भात अहमदनगरधून धक्कादायक वृत्त आले आहे.जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात आले आहे.अधिक माहिती अशी : राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथे एका कार्यक्रमासाठी गेलेल्या १५ व १६ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. ही घटना दि. १७ मे रोजी घडली आहे.
या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अपहरणचा गुन्हा दाखल केला आहे.एका ३५ वर्षीय महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सदर फिर्यादी महिला व त्यांची नणंद या दोघींचे कुटुंब राहुरी तालूक्यातील ताहराबाद परिसरात राहतात. फिर्यादी महिलेची एक १५ वर्षीय मुलगी आहे. तर त्यांच्या नणंदेची एक १६ वर्षीय मुलगी आहे. दि. १७ मे रोजी रात्री आठ वाजे दरम्यान सदर दोन्ही कुटुंब ताहराबाद परिसरात असलेल्या एका जागरणाच्या कार्यक्रमात गेले होते.
त्या ठिकाणाहून दोन्ही अल्पवयीन मुलींचे कोणीतरी अपहरण करून त्यांना पळवून नेले. नातेवाईकांनी सदर दोन्ही मुलींचा परिसरात शोध घेतला. मात्र त्या मिळुन आल्या नाहीत. दोन्ही मुली पैकी एका मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ५८६/२०२४ भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गून्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून मुलींचाही शोध घेत आहेत.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……