मुजफ्फरपूर (बिहार):- मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत अतिशय घृणास्पद कृत्य केले आहे. पीडित तरुणीवर तिच्या बॉयफ्रेंडसोबत त्याच्या मित्रांनी असे एकूण ४ जणांनी सामूहिक बलात्कार केला.या घटनेमुळे बिहार हादरले आहे. याप्रकरणी बिहार पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. इतर फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारच्या अहियापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणीला चुकीच्या नंबरवरून मिस कॉल आला होता. हा नंबर राजू कुमार नावाच्या तरुणाचा होता. राजू हा अहियापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो. एका चुकीच्या नंबरवरून आलेल्या मिस्ड कॉलनंतर दोघांची ओळख झाली. त्यानंतर या दोघांमध्ये बोलणं सुरू झाले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांना भेटू लागले.राजू आपल्या गर्लफ्रेंडला अनेकदा बाईकवरून फिरायला घेऊन जायचा. त्यांच्या भेटीगाठी खूपच वाढल्या होत्या. अशामध्ये राजूने त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला बोलावले.
नेहमीप्रमाणे ती त्याला भेटायला गेली. बाईकवरून तो तिला घेऊन गेला. अहियापूर परिसरात ते फिरायला गेले होते. यावेळी राजू तिला निर्जन ठिकाणी एका शेतामध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने आपल्या गर्लफ्रेंडला मारहाण केली. राजू दारूच्या नशेमध्ये होता.राजू ऐवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या तीन मित्रांना फोन करून बोलावून घेतलं. त्याने गर्लफ्रेंडसोबत जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. तरुणीने त्याला नकार दिला. तर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर राजूचे तिन्ही मित्र घटनास्थळी आले.
या सर्व जणांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. तरुणी त्यांना सोडून देण्यासाठी विनवनी करत होती पण त्यांनी तिचे एकही ऐकले नाही. यानंतर आरोपी तरुणीला तिथेच सोडून पळून गेले.या घटनेनंतर तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत बलात्कार करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. तपासात गुंतलेल्या पोलिसांनी मुख्य आरोपी राजूला अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……