विदर्भात , मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अग्निवर्षा.. चंद्रपूर जिल्ह्यात पडली धातूची मोठी रिंग; नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेला उधाण

Spread the love

नागपूर : साधारणतः रात्री ८ वाजताची वेळ. नागपुरात बहुतेकजन घराबाहेर फेरफटका मारत होते तर काही टेरे गप्पा मारत बसले होते. आणि अचानक आकाशातून अग्निवर्षा होताना दिसली. अनेकांनी ही अवकाशातील घटना पाहिली काहींच्या मनात कुतूहल तर अनेकांच्या मनात भीती होती उल्कावर्षाव होता की आणखी काही, ही चर्चा होती. भूगोल शास्त्रज्ञांनी मात्र हा उल्कावर्षावच असल्याच्या अंदाजाला दुजोरा दिला. विशेष म्हणजे विदर्भात ठिकठिकाणी आकाशातून होणारी ही अग्निवर्षा अनेकांनी पाहिल्याची माहिती आहे.

अवकाशातील घडणाऱ्या घडामोडीचे कुतूहल सर्वांनाच असते शनिवारी अशाचप्रकारची खगोलीय घटना नागरिकांना बघायला मिळाली.
रात्री ८ वाजताच्या सुमारास आकाशा आगीचे गोळे पडताना अनेकांनी पाहिले. नागपुरात रामदासपेठ, रामेश्वरी, जयताळा व इतर परिसरात ही अगि झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकांनी त्याचे फोटो, व्हि काढून एकमेकांना शेअर केले. उल्लेखनीय म्हणजे केवळ नागपूरच नाही तर खामगाव, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, बाजारगाव अमरावती ,जळगाव , जिल्हा आदी भागातही लोकांनी हा उल्का पाहिल्याची माहिती मिळाली आहे.

शनिवारच्या रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांत आकाशातून जलदगतीने काही लाल रंगाच्या वस्तू खाली असल्याचे अनेकांना दिसले. दरम्यान, सिंदेवाही तालुक्या लाडबोरी येथील ग्रामपंचायतीच्या मागे रात्री ७.४५ वाजत विशेष धातूची तप्त मोठी रिंग कोसळली.

त्यापूर्वी अनेकांना ती तप्त लाल रिंग आकाशातून गावाच्य दिशेने येत असल्याचे दिसले आणि क्षणातच ती प्लेट कोसळली. मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांनी एकच ग केली. ही धातूची रिंग एवढ्या वेगाने कोसळली की जिथे पडली, तेथील जमीनच त्या रिंगमध्ये आली. घटनेनंतर एकच गर्दी उसळली. तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले रात्री ८.१५ वाजता घटनास्थळी पोलिसांचा ताफा पोहोच त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळविले आहे. एखादे जुने सॅटेलाइट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली कोसळले असावे, अस् अंदाज खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांनी व्यक्त के आहे. विशेष म्हणजे, या वस्तू आकाशातून पृथ्वीच्या दिशेने येताना दिसले

टीम झुंजार