पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध, दोघात काही महिन्यांपासून बिनसलं, नैराश्यात डॉ ने सुसाइड नोट लिहून जीवन यात्रा संपविली.

Spread the love

अहमदाबाद (गुजरात): महिला डॉक्टरने १५ पानी सुसाइड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्या परिसरातच महिलेने जीवन संपवले. या घटनेने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.त्यात पोलिस निरीक्षकावर छळाचा आरोप केला आहे.वैशाली जोशी असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून महिला डॉक्टर आणि पोलिस अधिकारी यांच्यात काय संबंध होता याचा तपास केला जात आहे.

अहमदाबादच्या गुन्हे शाखेच्या कार्यालय परिसरात EOWच्या ऑफिसबाहेर बुधवारी सायंकाळी एका बेंचवर महिलेचा मृतदेह आढळला. हा मृतदेह वैशाली जोशी नावाच्या महिला डॉक्टरचा होता. मृतदेहाजवळ इंजेक्शनही आढळून आले आहे.खेडा जिल्ह्यातील बालासिनोरमध्ये राहणाऱ्या वैशाली जोशी हिने खासगी क्लिनिक सुरू केले होते. वैशाली अहमदाबादमधील शिवरंजनी परिसरात भाड्याने राहत होती.गेल्या २ आठवड्यापासून ती व्हीके खाचर नावाच्या पोलिस अधिकाऱ्याला भेटण्याचा प्रयत्न करत होती.

वैशालीच्या पर्समध्ये १५ पानी सुसाइड नोट आढळली आहे. सुसाइड नोटमध्ये गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्ही के खाचर यांच्यावर छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुन्हे शाखेत असलेल्या पोलिस निरीक्षक खाचर आणि महिला डॉक्टर यांच्यात गेल्या चार पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या नात्यात काही महिन्यांपासून बिनसलं होतं. यामुळे महिला डॉक्टर नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिने इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली.दरम्यान, पोलिस निरीक्षक व्हीके खाचर यांच्याविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार