आंबेडकरनगर (उत्तर प्रदेश):– प्रेमाची भावना खूप सुंदर असते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा तो प्रेमात अगदी सगळ्या मर्यादा ओलांडायलाही तयार असतो. प्रेमात चूक किंवा बरोबर असं काही नसतं. मात्र, आता प्रेमाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे.यूपीच्या आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचं एकाच वेळी चार तरुणांवर प्रेम जडलं. यानंतर ती या सर्वांसोबत पळून गेली. या सर्व प्रियकरांनी तरुणीला एकसोबतच पळून नेलं.मात्र, मुलीला पकडण्यात आल्यानंतर तिला त्यापैकी एकाशीच लग्न करण्यास सांगितलं गेलं.
मग खरा गोंधळ इथून सुरू झाला. मुलीला समजत नव्हतं की आता नेमकं कोणासोबत जावं. अशा स्थितीत पंचायतीला या प्रकरणावर तोडगा काढावा लागला. ज्या युक्तीने मुलीच्या भावी पतीचं नाव तिच्या प्रियकरांमधून निवडलं गेलं त्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही विचित्र प्रेमकथा 2021 ची सांगितली जात आहे. पण पुन्हा एकदा ती व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूपीच्या आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या एका मुलीचं परिसरातील चार मुलांवर प्रेम होतं.
मात्र ती सर्वांसह पळून गेली. तिला पकडल्यावर तिला यातील एकाशी लग्न करण्यास सांगितलं. यावर तिने सांगितलं की, यातील एक नवरा निवडण्याबाबत मी कन्फ्यूज आहे.जेव्हा मुलीने यातील एक व्यक्ती निवडण्यास असमर्थता व्यक्त केली. तेव्हा न्यायाधीशांनी मुलांना विचारलं. मात्र, चौघांपैकी कोणीही मुलीशी लग्न करण्यास तयार नव्हतं. अशा स्थितीत पंचांनी चौघांच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करून एका मुलाला यातील एक चिठ्ठी काढण्यास सांगितलं. कागदाच्या चिठ्ठीवर पहिलं ज्याचं नाव आलं त्याच्याशी मुलीचं लग्न लावण्यात आलं. ही विचित्र कथा 2021 ची आहे पण पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






