एरंडोल (प्रतिनिधी) – पावसाळा तोंडावर आला तरी एरंडोलला नदी-नाले सफाई नसल्यामुळे नागरीकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. जळगांवसह राज्यात सर्वत्र नदी-नाले सफाई सुरू असून एरंडोलला का नाही ? प्रशासक तथा मुख्याधिकारी बदली होवून ४ महिन्यांचा कालावधी उलटला तरी पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे कारभार (नपाचा) रामभरोसे सुरू आहे. लोकसभा निवडणूकीमुळे आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे परंतू प्रशासकाअभावी नागरीकांना, प्रशासनाला काय त्रास सहन करावा लागतो याचा विचार करणार कोण ?
नगरपालिकेत अथवा तहसिलदार कार्यालयात कोणत्याही कामासाठी नागरीक गेले असता लोकसभा निवडणूकीचे निमित्त सांगून नागरीकांची वाट लावली जाते. आता मतदान १३ मे रोजी संपले असले तरी आता ४ जून मतमोजणीचे निमित्त सांगितले जाते यास म्हणावे तरी काय ?
एरंडोलच्या प्रांताधिकाऱ्यांनी नपा अधिकारी आणि अंजनी प्रकल्प अधिकारींना पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छ करण्याचे आदेश देवून देखील जैसे थे परिस्थिती असते यास म्हणावे तरी काय ? अंजनी नदीतील गाळ, काटेरी झुडूपे, प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अचानक अतिवृष्टी झाल्यास होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण ? असा सवाल नागरीकांनी केला आहे. त्वरीत स्वच्छता व्हाची हीच अपेक्षा आहे
मागील वर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत कासोदा नाक्यापासून ते मरिमाता मंदिरासमोरील पुलापर्यंत मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी स्वतः उभे राहून जेसीबीच्या सहायाने संपूर्ण अंजनी नदीची सफाई करण्यात आली हाेती. त्यानुसारच यंदाही कामे व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा