अमरावती : अमरावती मधील पशुधन विकास अधिकाऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अर्जुननगर येथील स्नेहा कॉलरीमध्ये घडली आहे.चेतन सोळंके असे आरोपीचे नाव आहे तर दीप्ती चेतन सोळंके (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे.दीप्ती या देखील बँक अधिकारी होत्या. चारित्र्यावर संशय घेत चेतनने आपल्या पत्नीची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
दीप्ती चेतन सोळंके या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी पदावर होत्या. तर आरोपी चेतन सोळंके हा पशुधन विकास अधिकारी आहे. त्याने दीप्ती यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अमरावतीच्या अर्जुननगर येथील स्नेहा कॉलनीतील ही घटना आहे. आरोपीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली, आणि त्यानंतर ही हत्या नसून आत्महत्या आहे असे भासवण्याचा प्रयत्न केला. दीप्ती यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करण्यात आले, त्यानंतर त्यांचा मृतदेहाला गळफास लावण्यात आला. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे खरं कारण समोर आल्यानंतर पती आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.