एका तरुणाने तृतीयपंथीयास प्रेमाच्या जाळ्यात अडकवले,मग केलं लग्न आणि तरूणाने ४ लाख रुपयांत केली फसवणूक अन् घडलं हादरवणारं कांड.

Spread the love

कन्नौज : गेल्या काही दिवसांमध्ये प्रेमसंबंधांमध्ये फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. इतकेच नव्हे तर प्रेमप्रकरणातून हत्या, आत्महत्या, यांसारख्या घटनाही समोर येत आहेत.यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.एका तरुणाने एका तृतीयपंथीयाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याच्या मेहनतीचे पैसे फरार होऊन गेला. काजल असे या तृतीयपंथीयाचे नाव आहे. तर आमिर असे या फसवणूक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणावर आरोप आहे की, त्याने प्रेमाचे आश्वसन देऊ आधी लग्न केले मग तिच्या मेहनतीचे पैसे घेऊन फरार झाला.

यानंतर तिने या तरुणाला परत आणण्याचे प्रयत्न केले असता, तृतीयपंथीय काजल हिला जोरदार मारहाण केली आणि तिला पळवून लावले. यानंतर तिला गंभीर परिस्थितीत कन्नौज येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.काजल ही आजमगढ येथील रहिवासी आहे. ती मुंबईत भिक मागून आपले पोट भरते. मुंबईतच कन्नौज येथील रहिवासी असलेल्या आमिरशी तिची ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. यानंतर दोघांनी लग्नही केले. मात्र, बराच वेळ दोन्ही सोबत राहिले. मात्र, वेळ पाहताच आमिरने आपले खरे रुप दाखवले.काजल हिची 3 लाख 90 हजार असलेली जमापूंजी घेऊन आमिर कन्नौज येथे पळून गेला.

यानंतर ती आपले पैसे आणि आपले प्रेम परत मिळवण्यासाठी कन्नौज येथे आमिरच्या घरी आली. तिने त्याला सोबत राहण्यासाठी विनंती केली. मात्र, त्याने तिचे न ऐकता तिला मारहाण केली आणि पळवून लावले.जखमी अवस्थेत असलेल्या काजल हिला काही लोकांनी कन्नौज येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. यानंतर तिने कन्नौज येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत मदतीची मागणी केली आहे. तर याप्रकरणी पोलीस अधिकारी दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, तक्रारीवरुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

हे पण वाचा

टीम झुंजार