एरंडोल :- तालुक्यातील दापोरी रवंजे बुद्रुक रवंजे खुर्द खेडी खर्ची बुद्रुक खुर्द व परिसरात झालेल्या जोरदार वारा वादळ पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिसराची आज आ. चिमणराव पाटील यांनी पाहणी केली. व शेतकऱ्यांशी हजार नुकसाना बाबत माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान झालेल्या पिकांचे प्रांतअधिकारी मनिषकुमार गायकवाड व तहसिलदार सुचिता चव्हाण यांना पंचनामे करण्याचे आदेश केले व शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी मिळवुन देता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे ठोस आश्वासित केले.
याप्रसंगी मा.जि.प.सदस्य भिका कोळी, मा.पंचायत समिती सभापती नाना कोळी, रवंजे येथील सरपंच देविदास चौधरी, तालुका कृषी अधिकारी गंभीरे साहेब व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे पण वाचा
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.