चोरीच्या दोन मोटार सायकलींची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना चाळीसगाव पोलिसांनी घेतले ताब्यात.

Spread the love

चाळीसगाव :- दिनांक-08/06/2024 मा. श्री. महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधिक्षक जळगांव, यांच्या आदेशाने व मा कविता नेरकर (पवार) सो, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव तसेच मा.श्री अभयसिंग देशमुख, सहायक पोलीस अधिक्षक सो, चाळीसगांव भाग चाळीसगांव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरात पोलीस स्टेशन हद्दीत सक्त पेट्रोलिंग करण्याची मोहीम राबविण्यात आली होती.
वरीष्ठाच्या आदेशाने पोलीस स्टेशन हद्दीत सक्त पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, बेलखेडा ता. कन्नड येथील दोन इसम हे दोन मोटार सायकली या मार्केट कमिटी परीसरात विक्री करीता येणार आहे

या बाबत माहीती मिळाल्याने मा. पोलीस निरीक्षक श्री. संदिप पाटील सो. यांचे मार्गदर्शानाखाली लागलीच पोलीस पथक मिळालेली माहीतीची खात्री करणे करीता रवाना होवुन मार्केट कमिटी परीसरात जावुन अंधारात थांबले असता 21/30 वा. चे सुमारास दोन इसम हे त्यांचे ताब्यात दोन मोटार सायकली घेवुन मार्केट कमिटीचे आत आले तेव्हा त्यांना जागीच पकडुन त्यांचे ताब्यातील मोटार सायकलींबाबत विचारपुस करता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली.

तेव्हा त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे-1) बापुजी उर्फ लखन बळीराम राठोड वय- 35 रा. बेलखेडा तांडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर, 2) विवेक गणु आडे वय- 33 रा. बेलखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर असे सांगितले. वरील इसमांच्या ताब्यात 50,000/- रु. किंमतीच्या दोन मोटार सायकली (प्लॅटीना, फॅशन प्रो) अशा मिळुन आल्याने सदर इसमाविरुध्द पोकॉ/447 समाधान पाटील यांचे फिर्यादीवरुन गुरनं. 248/2024 महा. पोलीस अधिनियम कलम- 124 प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीतांचे ताब्यात मिळालेल्या मो. सा. हे जप्त करण्यात आले आहेत.

सदर मोटर सायकल कल्याण , ठाणे येथून चोरी केल्याची माहिती मिळाली आहे ..
सदरची कारवाई ही मा. पोलीस निरीक्षक, श्री. संदिप पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/1720 राहुल सोनवणे, पोहेकॉ/ 946 अजय पाटील, पोना/2800 भुषण पाटील, पोना/3136 महेंद्र पाटील, पोकॉ/1419 विजय पाटील, पोकॉ/208 आशुतोष सोनवणे, पोकॉ/2545 रविंद्र बच्छे, पोकॉ/3336 पवन पाटील, पोकॉ/988 ज्ञानेश्वर गिते, पोकॉ/552 ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ/447 समाधान पाटील, पोकॉ/2400 राकेश महाजन, पोकॉ/1808 मनोज चव्हाण यांचे पथकाने केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/946 अजय पाटील व पोकॉ/552 ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार