कोटा :- मध्य प्रदेशातील रीवा येथील विद्यार्थिनी राजस्थानमधील कोटा येथील जवाहर नगरमध्ये राहून नीटची तयारी करत होती. एक दिवस आधी (4 जून), नीट-युजीचा निकाल आला, त्यात कमी गुणांमुळे एका विद्यार्थिनीने इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.जवाहर नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी हरिनारायण शर्मा यांनी सांगितले की,
रीवा, मध्य प्रदेशातील बगिशा तिवारी कोटा येथील जवाहर नगर भागातील पुखराज एलिमेंट बिल्डिंगच्या 5 व्या मजल्यावरील खोली क्रमांक 503 मध्ये राहत होती. आई आणि भाऊही एकत्र राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, बगिशा एक वर्षापासून नीटची तयारी करत होती. Suicide in Kota तिचा भाऊ अकरावीत शिकतो आणि तोही जेईईची तयारी करत आहे. बगिशाचा नीटचा निकाल एक दिवस आधी आला होता. निकालात चांगले गुण न मिळाल्याने ती खूप नाराज होती. त्यानंतर विद्यार्थिनीने आत्महत्या केली.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 4 जून रोजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. जवाहर नगर पोलिस ठाण्याचे सर्कल इन्स्पेक्टर हरिनारायण शर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, बगिशाने 5 जून रोजी कोटा येथील बहुमजली इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली होती. याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बगिशा तिची आई आणि भावासोबत राहत असल्याची माहिती आहे. कुटुंबीय व इतरांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. उपचारही सुरू झाले मात्र तासाभराने बगिशाचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी महाराव भीमसिंग रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
हे पण वाचा
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.