रावेर: पती व पत्नीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रावेर तालुक्यातील असून याबाबत रावेर व निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पती पत्नीने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.खिरोदा येथे शेत-शिवारातील घटनास्थळी भुसावळ विभागाचे डीवायएसपी कृष्णकांत पिंगळे यांनी भेट देऊन पाहणी केली. मध्य प्रदेशातील बेलखेडा येथील सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण (४४) याने निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीत भोकर नदीजवळ एका बाभळीच्या झाडाला शर्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह रविवारी आढळून आला. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पत्नीचाही मृतदेह आढळला
खिरोदा, प्र. रावेर गावाजवळील रसलपूर-आभोडा रोडवरील कमलेश नत्थू महाजन यांच्या शेतात बेलखेडा येथील प्यारीबाई सुकलाल चव्हाण (४२) या महिलेचा मृतदेह सोमवारी आढळून आला. तिनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याबाबत शेतमालक कमलेश महाजन यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, तुषार पाटील, सतीश सानप, सचिन घुगे, राहुल परदेशी यांनी धाव घेतली. या दोन्ही पती- पत्नीच्या मृतदेहांचे शवविच्छेदन ग्राम रुग्णालयाचे डॉ. वैभव गिरी यांनी केले. दोघांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी गळफास घेतल्याने झाल्याचे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






