देहरादून :- पत्नीसोबत भांडण केल्यानंतर पती त्याच्या मैत्रिणीच्या घरी गेला होता. मात्र, रात्री झोपल्यानंतर सकाळी खोलीत तरुणाचा मृतदेहच आढळून आला. तरुणाचा मृत्यू झाल्याचं पाहून महिलेचं भान हरपलं. महिलेनं लगेचच तरुणाच्या पत्नी आणि कुटुंबीयांना फोन करून घटनेची संपूर्ण माहिती दिली आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. तरुणाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ओळखीच्या महिलेच्या घरी राहायला गेलेल्या 30 वर्षीय अझीम याचा मृतदेह सोमवारी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेनं याबाबत तरुणाची पत्नी, दाजी आणि पोलिसांना फोनवरून माहिती दिली.मंगळवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. अझीमची आई तारा बी यांनी महिलेवर हत्येचा आरोप केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अझीम त्यांचा मोठा मुलगा होता.
अझीमची पत्नी गुलिस्ता बी, मुलगा मोहम्मद जैन, दोन भाऊ समीर आणि वसीम घरात राहतात.तो प्लास्टरचं काम करायचा. लाइन नं. 17 येथील एका महिलेसोबत तो संपर्कात होता.. 14 मे रोजी अजीम तिला घरी घेऊन गेला. जिथे बराच गदारोळ झाल्यानंतर अजीमने घर सोडलं आणि महिलेसोबत तिच्या घरी राहायला गेला. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास महिलेनं अझीमची पत्नी गुलिस्ता, अझीमचा दाजी आणि पोलिसांना अझीमने फाशी घेतल्याची माहिती दिली
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना महिलेनं ती अझीमची पत्नी म्हणून असल्याचं सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवागारात पाठवला. पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचलेल्या अझीमच्या कुटुंबीयांनी महिलेवर हत्येचा आरोप केला आहे. वनभूलपुराचे एसओ नीरज भाकुनी यांनी सांगितलं की, कोणीही तक्रार दिलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आणि तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






