वादळी पावसामुळे उत्राण परिसरातील फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान, आ.चिमणरावजी पाटील यांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश.

Spread the love

एरंडोल :- उत्राण (ता.एरंडोल) परिसरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे सुमारे आठशे हेक्टरमधील फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून फळ उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वादळी पावसामुळे शेकडी घरांचे देखील नुकसान झाल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. आमदार चिमणराव पाटील यांनी उत्राण परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानीचे तातडीने
सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. नुकसानग्रस्त शेतक-यांना शासकीय स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार
असल्याची ग्वाही आमदार पाटील यांनी शेतक-यांना दिली.

निंबूचे आगार म्हणून ओळख असणा-या उत्राण येथे वादळामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील उत्राण,तळई परिसरात शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वा-यासह पाऊस झाल्यामुळे शेतीसह शेकडो घरांचे नुकसान झाले.वादळी पावसामुळे उत्राण परिसरातील ६८७ हेक्टरवरील निंबू,पेरू,मोसंबी, केळी,चिक्कू या फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.तसेच शेकडो घरांचे पत्रे उडून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. वादळामुळे ठिकठीकाणी अनेक वृक्ष उन्मळून पडल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती.सुमारे बाराशे शेतक-यांचे फळबागांचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

वादळी पावसामुळे उत्राण परिसरात झालेल्या फळबागांची आमदार चिमणराव पाटील यांनी पाहणी करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याची ग्वाही शेतक-यांना दिली.वादळामुळे लोणचे बनवणा-या निलॉन्स कंपनीचे शेड उडून गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.वादळामुळे सर्वाधिक नुकसान निंबूचे झाले आहे.नुकसानग्रस्त फळबागांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश आमदार चिमणराव पाटील यांनी प्रशासकीय अधिकार यांना दिले.पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देतांना शेतकरी भावनाविवश झाले आहेत.

आमदार चिमणराव पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतक-यांना दिलासा दिला.वादळी पावसामुळे शेतांमध्ये लिंबूसह अन्य फळांचे झाडे उन्मळून पडून सर्वत्र फळांचे खच पडले होते. यावेळी जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,पारोळा येथील नागरिक शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मिलिंद मिसर,पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन,उत्राणचे सरपंच आनंदा धनगर , चंद्रकांत वाघ यांचेसह कृषी अधिकारी,कृषी
पर्यवेक्षक, मंडळअधिकारी,तलाठी यांचेसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार