लातूर :- पीडिता बार्शी येथे कॉलेजमध्ये शिकत असताना पीडितेच्या ओळखीच्या एका युवकाने लातूर येथे लॉजवर पीडितेवर दुष्कर्म करून त्याचा व्हिडीओ बनवून तो दुसऱ्या व्यक्तीस दिला.त्या व्यक्तीने पीडितेला तुझ्या लहान बहिणीशी माझे लग्न लावून दे, नाही तर तो व्हिडीओ व्हायरल करीन, अशी धमकी दिली आहे. याबाबत पीडितेने त्या दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.ईश्वर मस्के (रा. लातूर) व प्रतीक सचिन दहिवाळ (रा. पिसादेवी मंदिराजवळ, संभाजीनगर, जि. संभाजीनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडिता ही बार्शी येथे शिकत असताना तिची ओळख ईश्वर मस्के याच्याशी झाली. ईश्वर मस्के याने लातूर शहरातील बस स्टँडजवळील लॉजमध्ये नेऊन बळजबरीने दुष्कर्म केले व दरम्यान तिचे फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच संशयित आरोपी प्रतीक याने फिर्यादी पीडितेच्या घरी जाऊन माझ्याकडे तुझा नग्न व्हिडीओ आहे, तो मी ईश्वर मस्के याच्याकडून पैसे देऊन विकत घेतला असल्याचे सांगितले. तू माझे लग्न तुझी लहान बहीण, हिच्याशी लावून दे, नाहीतर तुझा नग्न व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी प्रतीक दहिवाळ हा पीडितेस देत असल्याने मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेने यातील ईश्वर मस्के व प्रतीक दहिवाळ या दोघांच्या विरूध्द बार्शी पोलिसात तक्रार दिली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






