सहारनपूर (उत्तर प्रदेश) :- येथे एका 5 वर्षाच्या चिमुरडीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीची काकु आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काकुने किचनमध्ये मृतदेह लपवला होता. यानंतर भितीपोटी दुसऱ्या दिवशी मृतदेह पोत्यात भरुन जंगलात फेकून दिला होता. पोलिसांनी आरोपी काकु आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. कोर्टात हजर केल्यानंतर दोघांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
मृत मुलीच्या काकुचे एका तरुणासह विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. 5 वर्षाच्या चिमुरडीने काकुला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. यानंतर दोघांनाही मुलगी आपलं हे गुपित सर्वांना सांगत उघडं पाडेल अशी भिती वाटू लागली होती. आरोपी प्रियकराने मुलीच्या कानशिलात लगावली होती. यामुळे मुलगी बेशुद्ध पडली होती. यावेळी काकु तोंडावर पाणी मारण्यासाठी ते आणायला किचनमध्ये धावली. पण यादरम्यान तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर दोघांनीही मिळून तिची हत्या करण्याची योजना आखली. तिथेच गळा दाबून तिची हत्या करण्यात आली.
पोत्यात सापडला 5 वर्षाच्या मुलीचा मृतदेह
आरोपी काकुने हत्या केल्यानंतर मृतदेह घराच्या किचनमध्ये लपवून ठेवला होता. दुसरीकडे मुलीचे आई-वडील तिचा शोध घेत होते. काहीच पत्ता लागत नसल्याने अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस घरी दाखल होणार असल्याने घाबरलेल्या आरोपी काकुने मृतदेह एका पोत्यात बांधला आणि किचनधून जंगलाच्या दिशेला फेकून दिला. पोलीस पोहोचले असता डॉग स्क्वॉडला हे पोतं सापडलं. या पोत्यात मृतदेह होता. मृतदेह सापडला तेथून काकाचं घऱ जवळचत होतं. पोलिसांनी काका आणि काकुला ताब्यात घेत कसून चौकशी केली. यावेळी काकुने आपला गुन्हा कबूल केला.
काकुने सांगितलं की, तिचे गेल्या 6 वर्षांपासून शुभम नावाच्या तरुणासह प्रेमसंबंध सुरु आहेत. मुलगी घरी आली तेव्हा तो तिथेच होता. पतीचा विरोध असल्याने आम्ही लपून एकमेकांना भेटायचो. तिने आम्हाला आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याने आम्ही तिची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 तारखेला एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. तपासादरम्यान आम्हाला पोत्यात भरलेला मृतदेह आढळला. याप्रकरणी तिची काकु आणि प्रियकराला अटक कऱण्यात आली आहे. दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आलं असून, जेलमध्ये रवानगी झाली आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.