एरंडोल शहर युवासेनेच्या वतीने थाळी व टाळी बजाव आंदोलन…

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । एरंडोल

एरंडोल – देशात रोजच्या पेट्रोल, डिझेल, गॕस, खाद्यतेल, डाळी यांसह इतर संसारोपयोगी साधनांच्या वाढत्या दरामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक अक्षरशः होरपळुन गेला आहे. रोजच्या वाढत्या महागाईमुळे जनता अतिशय चिंतेत आहे. तसेच या महागाईला आवर घालण्यासाठी केंद्र शासनातर्फे कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नाहीये. त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. रोजगारासंदर्भात कुठलेच ठोस निर्णय घेतले जात नसतांना वाढत्या महागाईमुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालेले आहे.

याच अनुषंगाने पेट्रोल, डिझेल, गॕस, खाद्यतेल, डाळी यांसह संसारोपयोगी साधनांचा वाढत्या महागाई विरोधात एरंडोल शहर युवासेनेच्या वतीने केंद्र सरकारचे अभिनंदन करत अनोखे थाळी व टाळी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला… यावेळी युवासैनिकांकडून दरवाढीच्या निषेधार्थ फलक व गॅस सिलिंडर ला पुष्पहार अर्पण करण्यात आला….

प्रास्ताविक युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन यांनी केले…. समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन म्हणाले की केंद्र शासनाने “अच्छे दिन” चे स्वप्न दाखवत जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास केला, तसेच जर हेच तुमचे अच्छे दिन असतील तर आम्हाला आमचे बुरे दिन पुन्हा परत द्या असे आवाहन केले…. ज्याप्रमाणे कोरोना काळात लढण्यासाठी व त्यावर मात करण्यासाठी आपण थाळी व टाळी वाजवली, त्याच पद्धतीने या महागाई रुपी कोरोनाशी लढण्यासाठी व त्यावर मात करण्यासाठी आपण थाळी व टाळी वाजवू या जेणे करून केंद्र शासनाला जाग येईल…
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी सभापती शालिग्राम गायकवाड, मा.नगरसेवक नितिन बिर्ला, माजी नगरसेवक सुनील चौधरी, शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन, चिंतामण पाटील, राजेंद्र ठाकूर, विठ्ठल आंधळे, जावेद मुजावर, युवासेना तालुकाप्रमुख बबलू पाटील, सुनील मराठे, चंदू जोहरी, नासिर शेख, युवराज महाजन, पिंटू मिस्त्री आदि उपस्थित होते….

कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवासेना शहर समनव्यक अमोल भावसार, कुणाल पाटील, मोहन महाजन, गोविंदा बिर्ला, कृष्णा ओतरी, अजय महाजन, चेतन बडगुजर, अतुल मराठे, प्रसाद महाजन, राज पाटील, बबलू मराठे यांच्यासह अनेक युवासैनिकांनी परिश्रम घेतले…

टीम झुंजार