जळगाव :- गोल्डवर लोन देणारी जळगाव शहरातील मनप्पुरम फायनान्स लीमीटेड या संस्थेत बनावट सोने तारण करून पैसे उकळणारी टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव शहर पोलीसांना यश आले आहे.यात चार जणांना पोलीसांनी अटक केली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हे आग्रा आणि जळगावातील असल्याचे समोर आले आहे.हर्षल रविंद्र पेटकर, (वय २३ रा. नवीपेठ, जळगाव) वर्षे हे मनप्पुरम फायनान्स लिमीटेड या खाजगी संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. मनप्पुरम फायनान्स लिमीटेड संस्थेचे नवीपेठ परिसरातील कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय आहे.
सोने तारण ठेवून कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते.मनप्पुरम फायनान्स लिमीटेड संस्थेत १ जून रोजी बँकेत सायंकाळी ४.३५ च्या सुमारास आलेले जोराराम रानुराम बिस्नोई, खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा यांनी बनावट, खोटे सोन्याचा मुलामा चढवलेले दागिने खरे भासवून गहाण ठेवुन त्याबदल्यात कर्ज रुपी २ लाख ६६ हजार रुपये स्वतःच्या फायद्याकरीता लबाडीने मिळविले होते. ५ जून रोजी तशाच प्रकारचे दागिने घेऊन दोन इसम आल्याने ते पाहून व्यवस्थापक चक्रावले. तपासणी केली असता ते सोने बनावट असल्याचे त्यांचा लक्षात आले, त्यामुळे त्यांनी अगोदर सोने ठेवलेल्या दोघांना ज्यादा ४० हजार देण्याचे आमीष देत बोलावून घेतले.
बुधवारी ६ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जोराराम रानुराम बिस्नोई, खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा वर्षे हे वाढीव रक्कम घेण्यासाठी आले होते. बँकेचे सहकारी आणि व्यवस्थापक यांनी दोघांना कार्यालयात थांबवले आणि शहर पोलिसांना बोलावले. शहर पोलिसांनी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता एका लॉजमध्ये थांबलेले सतिषचंद शोवरन सिंग (वय-३२) आणि संतोष मुन्नालाल कुशवाह (वय-३५) दोन्ही रा. आग्रा, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले.याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात जोराराम रानुराम बिस्नोई (वय-५०) रा. दोडासर ता.जि.फलौदी, राजस्थान ह.मु. नशिराबाद ता. जि. जळगाव, सोन्याचा कारागीर खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा, (वय-३१) रा. आग्रा, उत्तर प्रदेश ह.मु. बालाजीपेठ जळगाव, सतिषचंद शोवरन सिंग, (वय-३२) आणि संतोष मुन्नालाल कुशवाह (वय-३५) दोन्ही रा. आग्रा, उत्तरप्रदेश शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रविद्र सोनार करीत आहे.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.