३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी क्लास वन अधिकारी सूनेने सासऱ्याची हत्या आणली घडवून,१ कोटी रुपयांची दिली होती सुपारी, तिच्या भाऊ पण होता सामील.

Spread the love

नागपूर :- मध्ये हिट अँड रन प्रकरण हे घातपाताचं असल्याचा उलगडा झाल्यानंतर यात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची ३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी सूनेनेच हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.क्लास वन अधिकारी असणाऱ्या अर्चना पुट्टेवार हिने ड्रायव्हरला हाताशी धरून आपल्याच सासऱ्याच्या खूनाची १ कोटी रुपयांची सुपारी दिली. यामध्ये सूनेच्या अधिकारी भावाचाही हात असल्याची माहिती आता समोर येत आहे. या प्रकरणी सुनेसह तिचा भाऊ आणि इतर चौघांना अटक करण्यात आली आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या खून प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणी गडचिरोलीत नगरविकास सहायक संचालक असलेल्या अर्चना पुट्टेवार हिच्यासह चालक सार्थक बागडे, नीरज निमजे, सचिन धार्मिक यांना अटक करण्यात आली होती.

यात कुणाला सुपारी दिली गेली, कोणाचा हात होता याचा शोध पोलिसांनी घेतला. पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात सून अर्चना पुट्टेवार हिच्या भावाचेही नाव समोर आले आहे. एनएसएमई संचालक असलेल्या प्रशांत पार्लेवार आणि आर्किटेक्ट असणाऱ्या पायल नागेश्वर यांची नावे समोर आली आहेत. पायल ही अर्चनाची सहायक होती. तिच्या माध्यमातूनच हा पैशांचा व्यवहार व्हायचा. बहिणीला तिच्या सासऱ्याचा खून करण्यासाठी प्रशांतने मदत केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल यांनी दिली. नागपूरमध्ये २२ मे रोजी ८२ वर्षांच्या पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा कारने चिरडून मृत्यू झाला होता. हिट अँड रन अपघात असल्याचं प्रथमदर्शनी आढळलं होतं.

पण पोलीस तपासात हा खून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अपघात असल्याचं भासवून खून करण्याचा कट सुनेनेच रचला होता.अर्चना ही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून असून पुट्टेवार यांची मुलगी योगिता हिचं लग्न अर्चानाचा भाऊ प्रवीण याच्याशी झालं होतं. मात्र प्रवीणचा २००७ मध्ये मृत्यू झाला. यानंतर योगितासोबत तिचे वडील पुरुषोत्तम हे रहायचे. योगिताला पुरुषोत्तम यांच्या संपत्तीतील मिळणारा आपल्याला मिळवता येईल यासाठी पुरुषोत्तम यांच्या खुनाचा कट सून अर्चना आणि तिचा दुसरा भाऊ प्रशांत यांनी रचला होता.

हत्येचा तीनदा प्रयत्न

अर्चना पुट्टेवार यांनी सासऱ्यांची हत्या करण्याचा तीनवेळा प्रयत्न केला. दोन प्रयत्नात पुट्टेवार यांचा जीव वाचला होता. पण तिसऱ्या प्रयत्नात पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मारेकरी गुन्हा करण्यात यशस्वी झाले. मे महिन्यात तीन प्रयत्न झाले होते. पहिला प्रयत्न हा ८ मे रोजी झाला होता. त्यानंतर दुसरा प्रयत्न १६ मे रोजी झाला. तिसरा प्रयत्न हा २२ मे रोजी झाला. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्यासाठी अर्चना पुट्टेवार यांनी हत्येसाठी कार विकत घेतली होती.

असा झाला उलगडा

मागील माहिन्यात मे २२ तारखेला नागपुरातील बालाजी नगर परिसरात एक हिट अँड रन घटनेत पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणी पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मुलगा डॉ. मनीष पुट्टेवार आणि त्यांची पत्नी अर्चना पुट्टेवार यांनी अजनी पोलिसात तक्रार नोंदवली. अपघात करून फरार झालेला कार चालकाला लवकर शोधावे, अशी विनंती दोघांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

या पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांनी एक सेकंड हॅण्ड कार खरेदी केल्याची माहितीही समोर आलीय. पोलिसांनी अर्चना पुट्टेकरासोबत अजून तीन जणांना अटक केलीय. या आरोपींची नावे सार्थक बागळे याने नीरज निमजे आणि सचिन धार्मिक अशी आहेत. या तिघांनी अपघाताचा कट रचवण्यासाठी कार विकत घेतली होती. यात नीरजला अपघात प्रकरणात अजनी पोलिसांनी अटक केली आणि जामिनावर सुटला होता. त्यानंतर तो बारमध्ये पैसे उडवत असल्यानं पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्यांचा अधिक तपास केला तेव्हा सून अर्चना हिचे नाव समोर आले. यात अर्चना हिचा भावाला सुद्धा कटात सहभागी असल्याने त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस आयुक्त रवींद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोली पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. सकाळी १० वाजताच सुमारास हा अपघात झाला होता. तपास सुरू असताना अपघात नसून हत्या असल्याचं समोर आलेत. मृतक पुरुषोत्तम यांच्यावर दोन वेळा यापुर्वी हत्येचा प्रयत्न झाला. यात सून अर्चना पुट्टेवार यांच्यासह दोन जण अटकेत आहे, तर दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. क्राईमब्रँच चार ने यात सखोल तपास केला. 17 लाख रोख, गोल्ड, चार कार जप्त केल्या आहे. कार car I20, मोपेड सह दोन कारही जप्त करण्यात आले आहे. वयोवृद्धाचा संपत्तीच्या वादातून खून झाल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलीय. यात संपत्तीमध्ये ऊंटखाना येथे प्लॉट आहे, शॉप्स आहे, २० ते २२ कोटीची प्रॉपर्टी समोर येत आहे, असा पोलिसांचा दावा आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार