Viral Video : सोशल मीडियावर अनेक पती पत्नीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी पती पत्नीच्या नात्यातील गोडवा दिसून येतो तर कधी त्यांच्या नात्यातील प्रेम दिसून येते. अनेकदा पती पत्नीचे भांडतानाचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पती पत्नी भांडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरणार नाही तर काही लोक अवाक् होतील. सासू समोर पत्नी नवऱ्याला मारताना दिसत आहे तर पती मात्र पत्नीपासून वाचण्यासाठी थेट घरावर चढला आहे.
सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.नवरा बायकोच्या भांडणाचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल. या व्हिडीओमध्ये पत्नी हातात जी वस्तू येईल त्याच्याने नवऱ्याला पळवून पळवून मारताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की घराच्या अंगणात एक महिला तिच्या सासूबरोबर उभी आहेत आणि घरावर तिचा नवरा पळताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल नवरा बायकोमध्ये जोरदार भांडण रंगले आहे आणि बायको हातात येईल ते नवऱ्याच्या अंगावर फेकताना दिसत आहे.
नवरा मात्र स्वत:ला वाचवत थेट घराच्या छतावर पळताना दिसत आहे. सासू सुनेला थांबवताना दिसत आहे पण सुन मात्र ऐकून घेत नाही आणि नवऱ्याच्या अंगावर हातात येईल ती वस्तू मारून फेकते. व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.@PalsSkit या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘पत्नीबरोबर वाद म्हणजे आयुष्य खराब करणे म्हणत होता की खूप तोंड चालवतेय’या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ‘खूप कठीण आयुष्य आहे’ तर एका युजरने लिहिलेय, ‘भावा मी लग्न करणार नाही’ आणखी एका युजरने लिहिलेय, ‘वैवाहिक आयुष्याचा आनंद घ्या’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.