नवी दिल्ली:- नाथाभाऊ हे भाजपचे जुने नेते. मध्यंतरी पक्षातील कुरबुरी वाढल्यानंतर त्यांनी वेगळा निर्णय घेतला. पण भाजपचा पिंड त्यांना काही सोडवेना. त्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये जाणार असल्याचे उघड केले होते.त्यानंतर आता त्यांची घरवापसी जवळपास पक्की समजण्यात येत आहे. नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्रसमोर येत आहे.केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल रात्री घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
भेटीला आले महत्व
काल रात्री केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ खडसे लवकरच भाजप मधे प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व आले आहे. यापूर्वी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या धबाडग्यात दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.
खडसे राष्ट्रवादीत, सून भाजपमध्ये
एकनाथ खडसे हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर त्यांची सून रक्षा खडसे या भाजपमध्ये आहेत. त्यांनी नुकताच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. नाथाभाऊंच्या आशीर्वादाने त्यांनी निवडणुकीत चमकदार कामगिरी केली. त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यानंतर आता या भेटीनंतर खडसे यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानल्या जात आहे.
नाथाभाऊंची नाराजी झाली कमी
राज्यात विशेषतः खानदेशात भाजपची पाळंमुळं घट्ट करण्यात नाथाभाऊंचा मोठा वाटा आहे. गेल्या 40 वर्षांपासून त्यांनी विविध पदांवर भाजपचे नेतृत्व केले. पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. पण पक्षातील अंतर्गत कुरबुरु वाढल्या. व्यथित होऊन नाथाभाऊंनी पक्ष सोडला. ते शरद पवार यांच्यासोबत गेले.
खानदेशात भाजपची ताकद वाढेल
शरद पवार यांनी संकटाच्या काळात दिलेली साथ नाथाभाऊ विसरलेले नाहीत. त्यांनी जाहीरपणे त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. आपण पवारांचे कायम ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नाथाभाऊ पुन्हा भाजपमध्ये आल्यास खानदेशात पक्षाची ताकद वाढणार आहे. आता त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त कधी लागतो, याकडे त्यांच्या समर्थकांचे, हितचिंतकांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.