एरंडोल :- तालुक्यातील संत हरिहर माध्यमिक हायस्कूल शाळेच्या शिपायाकडून दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकास जळगाव एसीबी पथकाने रंगेहात ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप प्रभाकर महाजन असे निपाने ता. एरंडोल येथील संत हरिहर माध्यमिक हायस्कूल येथील या लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.
या बाबत माहिती अशी की घटनेतील तक्रारदार हा शिपाई म्हणून या शैक्षणिक संस्थेत कामाला आहे. त्याच्या मागील प्रलंबित वेतन निश्चितीच्या फरकाची रक्कम 2,53,670/-रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांच्या कडे पाठवण्यात आला होता. या प्रस्ताव मंजुरीचे काम मुख्याध्यापक संदीप महाजन याने स्वतः च्या ओळखीने करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणुन मंजुर रकमेच्या 5% प्रमाणे 12,500/-रुपये लाचेची मागणी मुख्याध्यापक संदीप महाजन याने शिपायाकडे केली होती.
थकीत वेतनातील फरकाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक जळगाव एलसीबीच्या जाळयात अडकला आहे.संदीप प्रभाकर महाजन (वय-४४, रा. नेपाने ता. एरंडोल) असं लाचखोर मुख्याध्यापकाचं नाव असून या कारवाईने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.