सावदा, ता. रावेर: – रावेर तालुक्यातील सावदा शहरात १९ वर्षीय तरुणीचा विनय भंग केल्याची घटना घडली. सदरची घटना सोमवार रोजी घडली असून या प्रकरणी मंगळवार रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सावदा शहरातील एक १९ वर्षीय तरुणी घरात एकटी असल्याचं फायदा घेत शकील शब्बीर मोहम्मद वय ३८ वर्ष हा तिच्या घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा हात पकडून विनयभंग केला.
ही घटना २४ जून सोमवार रोजी दुपारच्या वेळेस घडली. पीडित मुलीने तिच्या कुटुंबीयांना सदरची घडलेली घटना सांगितल्याने त्यांनी सावदा पोलिस स्टेशनला दि. २५ जून मंगळवार रोजी तक्रार दाखल केली असून पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारी वरून शकील शब्बीर मोहम्मद यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावदा पोलिस करीत आहेत.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा