जामनेर(प्रतिनिधी):- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अंगणवाडी केंद्रात धडक अंगणवाडी तपासणी मोहीमेंतर्गत जामनेर तालुक्यातील तपासणी झालेल्या बालकांमधून कुपोषित बालकांसाठी उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे विषेश तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
आरोग्य विभाग,महिला बालकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन पेड्रीटीयाटिक असोसिएशनचे सदर शिबिरास अनमोल सहकार्य लाभले. डॉ.अमोल शेठ,डॉ.सतीश चौधरी,डॉ.संदीप पाटील,डॉ.प्रशांत महाजन,डॉ.राहुल निकम या बालरोग तज्ञांच्या मार्फत कुपोषित बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
एकूण २८३ जणांच्या तपासणीतून ३४ बालकांना जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले.
समता फाउंडेशन मार्फत अतिरिक्त औषध पुरवठा करण्यात आला.
शिबीर प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत,डॉ.नरेश पाटील,डॉ.दानिश खान,डॉ.प्रशांत महाजन,डॉ.चंद्रमणी सुरवाडे,डॉ.जितेंद्र वानखेडे,डॉ.धंनजय पाटील,डॉ.अनिता राठोड,डॉ.विजया पाटील,डॉ.स्वाती विसपुते, डॉ.निलेश चव्हाण बालविकास प्रकल्प अधिकारी शीला पाटील,संघमित्रा सोनार अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व राष्ट्रीय बाल स्वास्थ टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.