जामनेर (प्रतिनिधी):- पत्रकारांच्या समय सुचकतेने लाखो रूपयांचा गुटखा चोरट्या पद्धतीने वाहनातुन आणल्या जात असताना पकडुन दिल्याची घटना शहरात घडली. मध्यप्रदेशातून येणाऱ्या गुटख्याची महाराष्ट्र सीमेवरील मुक्ताईनगर केंद्रातून होते सर्रास वाहतूक जामनेर तालुका व परिसरात मध्य प्रदेश बऱ्हाणपूर कडून मुक्ताईनगर केंद्र असणाऱ्या व तिथून महाराष्ट्रामध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला लाखो रुपयांचा गुटखा विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे! पत्रकार प्रदीप गायके व राहुल इंगळे यांनी गाडीचा पाठलाग केल्यामुळे गुटख्याच्या अंदाजे चार लाख रुपये किमतीच्या पुड्या पोलिसांनी जप्त केल्या!
स्विफ्ट डिझायर गाडी नंबर (एम एच १९.बि.जे. ३७७१)यात अतिशय सर्रासपणे मुक्ताईनगर कडून जामनेर कडे हा गुटखा वाहतूक होत होती.
पत्रकार प्रदीप गायके यांना या संदर्भात माहिती मिळाल्यावर त्यांनी सोबतचे पत्रकार राहुल इंगळे सोबत बोदवड रोडवरील मोठ्या पुलापासून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु चालकाने गाडी न थांबवता ही कार जामनेर शहरात जळगाव रोडवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला! या स्विफ्ट डिजायर कार मध्ये गुटखा असल्याची माहिती पत्रकारांनी पोलिसांना दिली.जळगाव रोड वरील संत तुकाराम महाराज मराठा मंगल कार्यालयाजवळ पत्रकार प्रदीप गायके व राहुल इंगळे यांनी ही गाडी रोखून धरली.
अतिशय सिनेस्टाईल असा हा प्रकार घडला. स्विफ्ट कारचा चालक पवन मोहित गोसावी यांनी गाडी मधून लॉक केली आणि तो बाहेर सुद्धा येत नव्हता. तेवढ्यात पोलीस त्या ठिकाणी आले आणि पोलिसांनी गाडीसह आरोपीला जामनेर पोलीस स्थानकात आणले.
संबंधित चालक गोसावी याने दिलेल्या माहितीनुसार हा गुटखा स्वतः त्याचा व त्याचे भागीदार मुक्ताईनगर येथील गुटखा माफीया योगेश गोसावी व अनुपम गोसावी यांचा असल्याचे सांगितले. तो गुटखा मध्य प्रदेशाकडून मुक्ताईनगर मार्गे जामनेर तालुक्यात विक्रीसाठी येणार होता.
स्विफ्ट गाडीला पूर्णपणे काळ्या रंगाच्या फीत लावलेल्या होत्या. त्यामुळे आत मध्ये काय आहे हे काही कळायला मार्ग नव्हता. आरोपी पवन गोसावी याने सांगितले की आम्ही तिघे भागीदार ग्राहकाने दिलेल्या लाईव्ह लोकेशन पर्यंत माल पोहोचविण्याचे काम करीत असतो गाडीच्या सर्व काचांना काड्या फिल्मी लावल्या असल्यामुळे आत मध्ये काय आहे हे कोणालाच काही कळत नाही.
या स्विफ्ट कार मध्ये मागचे सीट काढून त्या ठिकाणी गुटख्याच्या गोण्या भरून ठेवण्यात आल्या होत्या.
कारवाईत पकडलेला हा गुटखा चार लाख तीस हजार रुपयाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा गुटखा पंचनामा करून पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आला. जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे अतुल पवार हे अधिक तपास करत आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.